सिडकोचा चारपट कर कमी होणार

जनतेची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आश्वासन

0

प्रतिनिधी – राजू मस्के

औरंगाबाद : सिडकोतील व्यावसायिक नोटीसांचा पुनर्विचार करून बांधकाम परवाना, ना हरकत प्रमाणपत्रासाठी सरसकट लावलेल्या चार पट करमध्ये दुरुस्ती करू. जनतेची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन सिडकोचे मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांनी आमदार अतुल सावे यांना दिले.

सिडको प्रशासनाने दिलेल्या नोटीसांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. ही माहिती समजल्यानंतर  आमदार अतुल सावे यांनी मुंबईत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे, महापालिका गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजू शिंदे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, बालाजी मुंढे, माधुरी अदवंत, सुरेखा खरात आदींची उपस्थिती होती.

निवेदनात उल्लेख केलेल्या मुद्द्यांपैकी सिडको लिज होल्डचे फ्री होल्ड करणे, हा विषय सिडको बोर्डाकडे पाठवला आहे. बांधकाम परवाना, ना हरकत प्रमाणपत्र शुल्क चारपट केले आहे. ते तातडीने कमी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच राज्य शासनाने दिलेल्या १.१ बेसिक ‘एफएसआय’ला सिडकोने रेडिरेकनर दर आकारणे सुरू केले आहे. तो रद्द करण्यासंदर्भातील विषय बोर्डाकडे असून घरांची डागडुजी करून देण्याविषयी सिडको सर्व्हे करून पुढील निर्णय घेईल, अशी माहिती सिडको प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here