मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही 

0

पूनम पोळ

आरेतील ३० हेक्टर जागेतील हजारो झाडांची कत्तल मुंबई मेट्रो कारशेडसाठी करण्यासाठी शिवसेना आणि अनेक संघटना यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना मुंबईच्या विकास आराखड्यात, या कारशेडच्या जागेला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळे परिपत्रक काढणे म्हणजे ही हुकूमशाहीच आहे, अशा कडव्या शब्दात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी  मेट्रो कारशेडप्रकरणी टीका केली आहे.

    आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडची महापौर यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांच्यासोबत नुकतीच पाहणी केली. शिवसेनेचा मेट्रो रेल्वेला विरोध नाहीमात्र येथील झाडांची होणा-या कत्तलीला विरोध आहे. हा विरोध यापुढे सुरू राहणार असून तो अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. 

   मेट्रो कारशेडसाठी हजारो झाडांची कत्तल करून आरेमधील हरित पट्टा हटविण्यास शिवसेना, सामाजिक संस्था, संघटना यांचा तीव्र विरोध आहे. सरकारने या मेट्रो कारशेडची आरे मधील जागा रद्द करून हे मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील जागेत हलविण्यात यावे, अशी सूचनाही महापौर महाडेश्वर यांच्यासह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली आहे. मेट्रो -३  प्रकल्पासाठी तब्बल सात हजार पेक्षाही जास्त झाडांचा बळी देणे, योग्य नाही ,असे सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे. या संघटनेकडून गेल्या तीन वर्षांपासून आरे मधील वादग्रस्त मेट्रो कारशेडच्या जागेला विरोध करण्यात येत असताना सरकार मात्र दाद देत नसल्याचे पदाधिकारी तस्लिमारोहित, झोरू, आशिष पाटील व बिजू अगस्ती यांनी सांगितले. तसेच या मेट्रो -३ प्रकल्पाअंतर्गत हटविण्यात आलेली झाडे पुनर्रोपित करूनही ती जगत नाहीत, अशी तक्रारही सामाजिक संघटनांनी केली असल्याचे महापौर म्हणाले.  भाजपकडून कोकण आयुक्तांवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे कोकण आयुक्त तारीख पे तारीख देत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here