चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुकानदार ठार

0

चंद्रपूर (प्रतिनिधी) :
ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. दुकानदार लघुशंकेसाठी दुकानाच्या मागे गेला असता वाघाने हल्ला चढवला. संदीप अर्जुन तितरे असे या इसमाचे नाव असून तो राळेगावचा होता व दुकानात काम करत होता. याआधीही असे हल्ले झाले असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here