तीन दिवसांत हलवणार पालकमंत्री सूत्रे

0

 

कोल्हापूर :  पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारांची जबाबदारी असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील १८ ते २० एप्रिल या कालावधीत सलग तीन दिवस कोल्हापुरात मुक्कामी असून प्रचाराची सूत्रे हलवणार आहेत.

पालकमंत्र्यांना दहा मतदार संघाची जबाबदारी दिल्याने ते जिल्ह्यात कमी व अन्य मतदार संघात जास्त वेळ कार्यरत आहेत. प्रचार संपवून पालकमंत्री मुक्कामाला कोल्हापुरात येण्याचा प्रयत्न करतात. कोल्हापुरात असताना पाच ते सहा गावात प्रचार करून पुन्हा अन्य जिल्ह्यात प्रचाराला जातात. पण महायुतीचा प्रचार करण्याठी तीन दिवस कोल्हापुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या साडेचार वर्षात पालकमंत्र्यांनी भाजपचा विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू भाजपचे आमदार अमल महाडिक प्रचारापासून अलिप्त आहेत. भाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. कोल्हापुरात प्रचार करताना पालकमंत्र्यांनी थेट खासदार महाडिक यांच्यावर टीका करण्यास सुरू केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सलग दोन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाडिक यांच्या पॅचअपचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सलग तीन दिवस कोल्हापूर आणि हातकणंगलेत प्रचार करणार आहेत.

पालकमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षात शहरासह जिल्ह्यातील अनेक मंडळे, तालमी व संस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत. तसेच व्यापारी, उद्योजकांची भेट घेऊन ग्रास रुटवर प्रचार करणार आहेत. तीन दिवसात प्रचाराची दिशा महायुतीच्या बाजूने वळवण्यासाठी पालकमंत्र्याकडून प्रयत्न केल्याने भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here