चंदगड तालुक्यातील ३ कोटी ६१ लाखांच्या कामांना आम.कुपेकरांकडून मंजुरी

0

चंदगड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सन २०१९-२० च्या कार्यक्रमातून चंदगड तालुक्यातील सातवणे, आमरोळी आणि हल्लारवाडी येथील ३ कोटी ६१ लाख ४० हजार रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिली. सातवणे जोड रस्ता ते हरिजन वस्तीपर्यंत ८० लाख ७६ हजार, हल्लारवाडी रस्ता सुधारणा करणे ५२ लाख ९३ हजार, आमरोळी ते कुमरी गडहिंग्लज हद्दीपर्यंत २ कोटी २७ लाख ७१ हजार अशी एकूण ३ कोटी ६१ लाख ४० हजार रुपयांची कामे मंजूर झाली असून या कामांचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here