चंदगड तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबद्ध : आम. संध्याताई कुपेकर

चंदगड तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ

0

 

चंदगड ( प्रतिनिधी ) : चंदगड तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ काल ( दि.२३ ) रोजी आम. संध्याताई कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

चंदगड तालुक्यातील इनाम कोळींद्रे येथे पीकअप शेड बांधण्यासाठी ३ लाख, कांजीर्णे येथे पीकअप शेड बांधण्यासाठी ३ लाख रुपये व आसगाव पैकी चुरणीवाडा येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सुमारे ५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. ह्या विकासकामांचा शुभारंभ करताना आम. कुपेकर म्हणाल्या , आगामी काळात तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

यावेळी डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, चंदगड तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या विकासापासून वंचित राहिलेल्या वाड्यावस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रयत्नशील राहील. आजपर्यंत या तालुक्याच्या विकासासाठी संपूर्ण निधी दिला आहे, या भागाचा पर्यटन विकास व्हावा यासाठी इसापूर ते चौकुळ तसेच झांबरे ते बेरडवाडी हे रस्ते जोडण्यात आले आहेत. आणि पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर स्थानिक रोजगार पण वाढीस लागणार आहे. आपल्या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात जनतेने विकासकामाबरोबरच रहावे असे आवाहन केले. शुभारंभ प्रसंगी श्री बाबुराव हळदणकर म्हणाले, चंदगड तालुक्याच्या विकासाला स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पासून सुरवात झाली व तोच विकासाचा वसा आम. संध्याताई कुपेकर व डॉ. नंदाताई बाभुळकर चालवत आहेत.

यावेळी गोकुळ दुध संचालक रामराज कुपेकर, चंदगड तालुका संजय गांधी निराधार अध्यक्ष श्री बाबुराव हळदणकर, पं स सदस्य दयानंद काणेकर, गणेश फाटक, सरपंच अंजली गावडे, सरपंच सविता कांबळे, रवळनाथ गावडे, राजाराम गावडे, रमेश कुट्रे, संजय गावडे, मारूती चिंचणगी, विठ्ठल गावडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here