केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सलवादे कुटुंबियांची भेट

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आज (सोमवार) आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व महेश सलवादे यांच्या भीमनगर, गडहिंग्लज येथील घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
रामदास आठवले आज गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. बटकणंगलेहून गडहिंग्लजला जात असताना त्यांनी राष्ट्रवादीचे महेश सलवादे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी सलवादे यांचे वडील कै. रमेश सलवादे यांच्या फोटोला हार घालून जुन्या आठवणींना उजाळा दिला. रमेश सलवादे हे रामदास आठवले यांचे निकटचे कार्यकर्ते होते.तसेच वडिलांच्या विचारावर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महेश सलवादे यांच्या कार्याचेही कौतुक केले. यावेळी महेश सलवादे यांचे सहकुटुंब उपस्थित होते.
त्यानंतर गडहिंग्लज प्रांत कार्यालयाजवळ विविध संघटनांनी त्यांचे स्वागत केले व प्रांत कार्यालय आवारात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here