फिटनेस क्षेत्रात करियरच्या संधी

0

आवड जपत त्याच क्षेत्रात करियर करण्याची संधी म्हणजे सौंदर्य आणि आरोग्य सुदृढ ठेवण्याची संधी. पण यात महत्वाचा भाग म्हणजे आरोग्य. आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आरोग्य उत्तम राखण्यासाठी भारतातील प्राचीन पद्धत म्हणजे योगा होय. योगासोबतच शरीर स्वास्थ्यासाठी, बळकटीकरणासाठी अनेक ठिकाणी जीम, योगा क्लासेस असे विविध हेल्थ सेंटर पहावयास मिळतात. या क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास तुम्हाला जगभर काम करण्याची संधी प्राप्त होते.

यासंदर्भातील काही शिक्षणक्रम पाहू –

मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन – हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. बी.पी.एङ हे शिक्षणक्रम ५० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण एक लाख ५० हजार शिक्षणक्रम शुल्क आहे.

बी.एस.स्सी. इन योगा – हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. ५० टक्केसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा सायन्स –
हा १८ महिन्याचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. विज्ञान शाखेतून पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. साधारण ७५ हजार शैक्षणिक शुल्क आहे.

एम.ए. इन योगा ॲण्ड कॉन्शीयसनेस – हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. साधारण ५२ हजार शैक्षणिक शुल्क आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी – हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा इन योगा – हा १८ महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक असून, १७ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. १५ हजार साधारण शैक्षणिक शुल्क आहे. फोर्टीज हॉस्पीटल, दिशा आय हॉस्पीटल, मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल आदी नामांकित हॉस्पीटलमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पा थेरपी ॲण्ड मॅनेजमेंट – हा १५ महिन्याचा अर्धवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. १० + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विविध नामांकित संस्थेत काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन ब्युटीशियन ॲण्ड स्पा मॅनेजमेंट हा १० वी नंतरचा ६ महिन्याचा पदविका शिक्षणक्रम आहे.

नैसर्गिकशास्त्र आणि योगा विषयात पदव्युत्तर पदवी – हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. ४५ टक्केसह पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. १२,५०० साधारण शिक्षणक्रम शुल्क आहे.

पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन योगा एज्युकेशन – हा एक वर्षाचा पूर्णवेळ योगा विषयातील पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. 20 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी – हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. फंडामेंटल ऑफ योगा, ह्युमन ॲनॉटॉमी ॲण्ड फिजीओलॉजी, अल्टरनेटीव्ह थेरपीज आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.

बॅचलर ऑफ आयुर्वेदा, मेडीसीन ॲण्ड सर्जरी –
हा ६ महिन्याचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे. १०+ २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अण्णासाहेब आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सांगली येथे हा शिक्षणक्रम उपलब्ध आहे.

स्कुल ऑफ आयुर्वेदा, डी.वाय.पाटील विद्यापीठ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय, वर्धा, भारती विद्यापीठ आदी शिक्षणसंस्थेत संबंधित शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here