ग्रंथालय शास्त्रांतील करिअर

0

वाचन करणे हा सुखद आनंद देणारा क्षण असतो. जगातील अनेक महान व्यक्तिमत्वे वाचनाने घडल्याचे सांगतात. वाचन हा आत्मनुभूतीचा आनंद देणारा महत्वाचा घटक आहे. आज कितीही तंत्रज्ञानाचा शोध लागला तरी पुस्तकांचे महत्व कमी झालेले नाही. जगभरात अनेक दुर्मिळ ग्रंथालये आणि पुस्तके वाचकांच्या दिमतीला उभी आहेत. इंटरनेटच्या युगात पुस्तके संगणकावर आली तरी ग्रंथालयात जाऊन वाचणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अचूक संदर्भ शोधण्यासाठी ग्रंथालायाशिवाय पर्याय नसतो. कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटते लाखो पुस्तकांच्या गराड्यातून ग्रंथपाल आपल्याला हवे ते पुस्तक अचूक कसं काय शोधून देतो ? तर ही एक कला असते ग्रंथालय शास्त्राची अर्थात ते ही एक उत्तम व्यवस्थापन असते. यासाठी ग्रंथपालास त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. एकंदरीत ग्रंथालय हा माहितीचा सर्वात मोठा स्त्रोत असून पुस्तकात रमणाऱ्यांसाठी हा करिअरचा उत्तम पर्याय होऊ शकतो.

पात्रता

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा ग्रंथालयशास्त्र प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. बारावी नंतर बी.एल.एस्सी. ही करता येतो. तसेच कोणत्याही पदवी नंतर बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स (बी. लिब.) कालावधी- एक वर्ष, हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्यानंतर मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (एम.लिब.) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे. तसेच या विषयात एम.फिल. आणि पीएच.डी. करता येते. नेट, सेट या परीक्षा देखील देता येतात.

आवश्यक गुण

यशस्वी ग्रंथपाल होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्य हवे. तसेच कालानुरूप अद्ययावत राहण्याची तयारी हवी. माहितीचा स्त्रोत म्हणून ग्रंथपालाकडे लोक पाहतात त्यानुसार या क्षेत्रातील नव्या बदलांची माहिती असावी. तसेच संगणक हाताळणीचे ज्ञानही हवे.

कोणत्या पदावर काम करू शकता?

लायब्ररी असिस्टंट

डेप्युटी लायब्ररियन

लायब्ररियन

डायरेक्टर/हेड ऑफ इन्फॉर्मेशन सेंटर

इन्फॉर्मेशन असिस्टंट अटेंडंट

नोकरीच्या संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल म्हणून काम करता येईल. विद्यापीठ, बँका, सार्वजनिक संस्था, कायदे संस्था, वृत्तपत्र, प्रकाशन संस्था, खासगी संस्था, कंपन्या, सरकारी संस्था, संघटना, संग्रहालये, कंपन्या, विधि सल्लागार कंपन्या, वैद्यकीय केंद्रे, धार्मिक संघटना, संशोधन प्रयोगशाळा, म्युझियम्स, फॉरेन एम्बसी, फोटो किंवा फिल्म ग्रंथालय अशा विविध ठिकाणी नोकरी मिळेल. तसेच नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अध्यापनाचे काम करता येईल.

प्रशिक्षण संस्था

मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ (मुंबई)

शिवाजी विद्यापीठ विद्यानगर, कोल्हापूर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

नागपूर विद्यापीठ, नागपूर

अमरावती विद्यापीठ तपोवन,अमरावती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here