सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार – काँग्रेस

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी दिल्लीत अल्पसंख्याक संमेलनात महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुष्मिता देव यांचे खळबळजनक वक्तव्य आहे. सत्तेत आल्यास नरेंद्र मोदी सरकाराचा तिहेरी तलाक कायदा रद्द करणार असल्याचे देव यांनी स्पष्ट केले आहे तसेच हा कायदा म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप सुष्मिता देव यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्यावतीने दिल्लीत एक परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here