संत गजानन इंजिनिअरिंगमध्ये शनिवारी कॅम्पस इंटरव्ह्यू

0

महागाव : महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयात शनिवारी (दि.२२) रोजी पुणे येथील व्हेरको इंजिनिअरिंग प्रा.लि. कंपनीसाठी इंजिनिअरिंग पदवीका आणि आय.टी. आय. उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले आहे.
इंजिनिअरिंग पडविकेमधील अंतिम वर्षात शिकत असलेले मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील तसेच आय.टी. आय. मधून मशिनिष्ट, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर, ड्राफमॅन, मॅकेनिकल शाखेतील २०१८ या वर्षात उत्तीर्ण विध्यार्थी पात्र असतील , ही भरती फक्त पुरुष विद्यार्थ्यांसाठीच आयोजित करण्यात आली आहे, पदविकेसाठी १०५०० तर आय.टी. आय च्या उमेदवारी साठी ९७०० प्रति महिना इतका पगार असणार आहे. तरी इच्छुक विध्यार्थ्यांनी नाव नोंदणी इंटरव्ह्यू दिवशी करण्यात येणार आहे तरी अधिका अधिक विध्यार्थ्यांनी हजर रहावे असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here