नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे आमदार बुक्कल नवाब यांनी अयोध्येतल्या श्रीराम मंदिरासाठी १० लाख रूपयांची देणगी देऊ अशी घोषणा केली आहे. श्रीरामाच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट भेट देऊ असंही म्हटलं आहे. बुक्कल नवाब आणि ठाकूर जयवीर सिंह या दोन समाजवादीच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बुक्कल नवाब यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बुक्कल नवाब यांनी अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजावर कसे अन्याय झाले याचाही पाढा वाचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here