सामान्यांच्या जीवनात नवा प्रकाश आणणारा अर्थसंकल्प  – नारायण राणे

मच्छीमार समाजासाठी ह्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत

0

प्रतिनिधी :  पूनम पोळ

मुंबई: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८ या वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, सामान्य गरीब नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वस्तरातील जनतेच्या जीवनात नव्या प्रकाशाची पहाट येणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. आयुष्यमान भारत कार्यक्रम नियोजिल्याप्रमाणे अमलात आल्यास ५० कोटी गरीब नागरिकांना फायदा होणार आहे. कृषी उत्पादनाला बाजारपेठेसंबंधी व उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट आधारभूत किंमत तसेच शेती कर्जपुरवठ्यामध्ये केलेली भरघोस वाढ यामुळे शेतकरी वर्गासमोरील प्रश्न सुसह्य होणार आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणातील तरतुदी व महिलांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांमुळे महिला व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी व पायाभूत सुविधांसाठी केलेल्या तरतुदी स्वागतार्ह आहेत. मच्छीमार समाजासाठी ह्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत करीत असताना मासे पकडण्याच्या जाळ्यांवर प्रस्तावित केलेला कर रद्द करण्यात यावा, अशी मी मागणी देखील त्यांनी केली. २०१८ या वर्षासाठी सादर अर्थसंकल्पामध्ये गरीब व सर्वसामान्य, महिला, वयोवृद्ध व विद्यार्थी वर्गाला दिलासा देणाऱ्या योजना असल्यामुळे मी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत असल्याचे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here