बीएसएनएलचे जीएसटी सेवा पोर्टल

0

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने आपल्या देशातील आघाडीची जीएसटी सेवा पुरवठादार कंपनी म्हणून ख्यात असणार्यान मास्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत सहकार्याचा करार करून देशभरातील ग्राहकांसाठी जीएसटी सेवा पोर्टल सुरू केले आहे. यात अगदी प्राथमिक पातळीपासून ते जीएसटी करयुक्त बिलींगची सुविधा देण्यात आली आहे.
यासाठी http://bsnlgst.mastersindia.co हे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर गेल्यानंतर युजरला पहिल्यांदा लॉगीन करावे लागते. यानंतर अगदी जीएसटीएन क्रमांक मिळवण्यापासून ते याच्या मदतीने आपल्या व्यापार/व्यवसायाचे वेगवेगळे इनव्हॉइसेस (बिल) तयार करण्याची सुविधादेखील यात प्रदान करण्यात आली आहे.

याच्या अंतर्गत एका जीएसटीएन क्रमांकाच्या मदतीने वर्षभरात दोन हजार देयके (बिले) मोफत करता येणार आहेत. याच्यापेक्षा जास्त बिले तयार करण्यासाठी प्रति बील एक रूपया या दराने आकारणी करून ही सेवा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याशिवाय जीएसटी सेवा पोर्टलच्या माध्यमातून जीएसटी परचेस डाटा, जीएसटी सेल्स डाटा, इंपॉर्ट डाटा, रिटर्न्स, रिकॉन्सीलियेशन आदी सेवादेखील प्रदान करण्यात येणार आहेत. यात रिअल टाईम जीएसटी अपडेट, लेजर मॅनेजमेंट आदींची सुविधादेखील असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here