बीएनएनएलची ‘लूट लो’ ऑफर

0

बीएनएनएलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘लूट लो’ ही नवीन ऑफर जाहीर केली आहे. या प्लान अंतर्गत वाढीव डाटा देण्यात येणार आहे.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएनएनएलने अनेक किफायतशीर प्लॅन आणि ऑफर जाहीर केल्या आहेत. यात आता ‘लूट लो’ची भर पडली आहे. याच्या अंतर्गत विविध पोस्टपेड प्लॅनवर ६० टक्के इतका डिस्काऊंट देण्यात येत असून याच्या सोबतीला ५०० टक्के अधिक डाटा देण्यात येत आहे. याच्या अंतर्गत २२५, ३२५, ५२५, ७२५, ७९९, ११२५ आणि १५२५ रूपयांच्या प्लॅन्सवर ६० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर डाटाचा विचार करता, ९९ आणि १४९ रूपयांच्या प्लॅनवर प्रत्येकी ५०० मेगाबाईट इतका डाटा मिळेल. २२५ आणि ३२५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ३ व ७ जीबी इतका डाटा मिळेल. तर ५२५, ७२५, ७९९, ११२५ आणि १५२५ रूपयांच्या प्लॅनमध्ये अनुक्रमे १५, ३०, ६० आणि ९० जीबी डाटा मिळणार असल्याचे बीएसएनएलतर्फे जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरातील पोस्टपेड ग्राहकांना या नवीन ऑफर सादर करण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here