ठाणे महानगर पालिकेत सरकारी नोकरीचा आमिष देऊन पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0

पालघर – योगेश चांदेकर

पालघर- डहाणू तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार आदीवासी तरुणांना ठाणे महानगर पालिकेमध्ये  सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत  तालुक्यातील 3 मुलांना एकूण 3 लाखाप्रमाणे 9 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

डहाणू तालुक्यातील कळमदेवी  येथील शैलेश भोये,कासा येथील संतोष यादव, विक्रमगड तालुक्यातील कवडास येथील दिनेश कवटे अशा तीन जणांना ठाणे महानगरपालीकेत  शिपाई या पदावर कामावर लावतो असे सांगत त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये उखळून तुम्हास  तीन महिन्यात नोकरी देतो असे सांगत शासकीय बनावट नियुक्ती पत्र,ओळखपत्र व पैसे घेत असल्याची वचन चिठ्ठी लिहून एकूण तीन जणांनकडून 9 लाख रुपये घेतले आहेत याबाबत फसवणूक झालेल्याची हकीकत डहाणू शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर व कार्यकर्ते यांना माहिती दील्यानंतर त्यांनी कार्यकर्ते यांच्यासह थेट कासा पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली.

दरम्यान आरोपी सागर घुटे, रा धरमपूर,जयवंत कोठरे रा.ठाणे पातलीपाडा,सूरज नंदू मोरे अंकुश घुटे अशा चार आरोपीपैकी 3 जणांना कासा पोलिसांनी अटक केली आहे यातील अंकुश घुटे हा बेरोजगार  मुलांना शोधून देतो तर सागर घुटे सदर पैसे वसुली करून जयवंत कोठरे यांच्याकडे पैसे नेऊन देण्याचे  काम करीत होता या सर्व घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे तर जिल्यात असे एकूण 15 मुलांची फसवणूक झाली असल्याची नावे समोर येत असून याबाबत कासा पोलीस ठाण्यात 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून  याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश  सोनवणे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here