बनावट नोटा देणाऱ्या दोघांना औरंगाबादेत अटक

0

राजू म्हस्के

औरंगाबाद : तीस हजार चालनी नोटांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा देतो असे थाप मारून लुटणाऱ्या  तेलंगणा येथील दोन भांमट्याना  गुन्हेशाखेच्या पथकाने रेल्वेस्थानक भागातून अटक करीत त्यांच्या ताब्यातून कोयता व नोटा ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा विशिष्ट लाकडी बॉक्स पोलिसांनी जप्त केला आहे.

तेलंगणा राज्यातील एक टोळी चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देते आणि  समोरच्या व्यक्तीला संशय आल्यास चाकूचा धाक दाखवत लूटत असतात ती टोळी शहरातील रेल्वेस्थानक भागात येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारे गुन्हेशाखेच्या पथकाने रेल्वेस्थानक ते महावीर चौक रस्त्यावर सापळा रचून  तेलंगणा राज्यातील सय्यद गैस सय्यद मकदुम व शेख हैदर शेख कादर या दोन भामट्याना ताब्यातून घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून काही चालणी नोटा, जुन्या पेपर ची रद्दी, कोयता व पैसे ठेवण्यासाठी बनविण्यात आलेला एक विशिष्ट प्रकार चा लाकडी बॉक्स पोलिसांनी जप्त केला, या दोघांनी या पूर्वी नांदेड निजामाबद या ठिकाणी लोकांची फसवणूक करून लुटल्याची माहिती समोर येत आहे या आरोपी कडून अजून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here