कासा येथील विज्ञान प्रदर्शनात पळे बोरीपाडा शाळेची बाजी

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डॉ ए पि जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त दिनांक २१ ऑक्टोंबर २०१८ रोजी छञपतींचा मावळा प्रतिष्ठाण कासा-चारोटी, ता डहाणू,जि पालघर आयोजित,पेन्स सहयोग फाऊंडेशन, इंडियन डेवेलपमेंट फाऊंडेशन आणि KIFS, मुंबई यांच्या सहयोगाने डहाणू तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले, यामध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून प्रतिष्ठाणने हा यशस्वी प्रयत्न केला, यामध्ये १ ते ५ गटामध्ये जि प शाळा पळे बोरीपाडा यांचा सौरऊर्जेवरील प्रकल्प विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला व पळे बोरीपाडा शाळेस प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. या प्रकल्पाला राज्यपुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षिका सौ प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनी मार्गदर्शन केले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष समशेर मानेशिया व कार्याध्यक्ष हरेश मुकणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालघर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, गटशिक्षणाधिकारी विष्णू रावते, विस्तार अधिकारी महादेव पवार, संजय वाघ, केंद्रप्रमुख अस्मिता पाटील यांनी मुलांचे विशेष कौतुक केले आहे.

व्दितीय क्रमांक भिसे हायस्कूल, तृतीय ओम इंग्लिश स्कूल, ६ ते ८ गटात प्रथम भिसे हायस्कूल, व्दितीय जि प शा खानिव, तृतीय एस पि एस हायस्कूल बोर्डी, तर ९ वी ते १२ वी मध्ये कोरे विद्यालय ऊर्से यांनी पारितोषिक मिळवली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डहाणू पंचायत समितीचे उपसभापती शैलेश करमोडा,जि प सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य काशिनाथ चौधरी,माजी समाज कल्याण सभापती पांडुरंग बेलकर,सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव, शिक्षण विस्तार अधिकारी संजय वाघ , शिक्षक नेते प्रकाश मरले विठ्ठल ठाणगे, केंद्रप्रमुख सुरेश भोये, नंदकुमार लिलका, पुज्य भिसे हायस्कूल कासाचे मुख्याध्यापक परदेशी सर, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रतिभा क्षीरसागर-कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक संतोष तळेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आबंदे सर तर सुत्र संचालन सुक्ते सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वितेकरिता छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समशेर मानेशिया, कार्याध्यक्ष हरेश मुकणे, सचिव महेश शेकडे, उपाध्यक्ष संतोष तळेकर, श्रीकांत सुकते, निर्मळ सर, म्हेत्रे सर, अनिल वाकळे, बापू चव्हाण, हाके सर, आशिष चव्हाण, मनोज पाटील, किशोर पुजारी, संजय सावकारे, निखील शिवदे, किरण शिवदे, महेश शेकडे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here