४० विद्यार्थ्यांनी भरलेली बोट डहाणूच्या समुद्रात उलटली

समुद्रात उलटलल्याने चारजणांचा दुर्दैवी अंत

0

डहाणू:  ४० विद्यार्थ्यांनी भरलेली बोट डहाणूच्या समुद्रात उलटण्याची दुर्देवी घटना घडलीय.  या घटनेत चारजणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून  ३२ जणांना वाचवण्यात यश आलं यश आलंय.  इतर विद्यार्थीचा अद्याप शोध सुरु आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे तटरक्षक दलाच्या मदतीने बचावकार्य करत आहेत.

सूत्रांकडून मिळेलेल्या माहितीनुसार सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडलीय. के. एल. पोंडा ज्युनिअर कॉलेजचे हे विद्यार्थी असून डहाणू येथील समुद्रात फेरीबोटीने फिरायला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.  त्यावेळी काही विद्यार्थी फेरीबोटीच्या टपावर चढून सेल्फी घेत असताना बोट उलटल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here