गुजरातमध्ये भाजपचा षटकार

0

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असून सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे. गुजरातमध्ये भाजपचा सहज विजय होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र काँग्रेसने ७७ जागा जिंकत भाजपला कडवी झुंज दिली.  १८२ जागांच्या विधानसभेत भाजपने ९९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या होम पिचवर  शतकमात्र पूर्ण करता आले नाही. २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला १६ जागांचा फटका बसला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सत्तांतर करण्यात अपयश आले असले तरी २०१२  च्या तुलनेत प्रभावी कामगिरी करतांना ८०  जागा खिशात घातल्या. २०१२  च्या तुलनेत काँग्रेसला जवळपास २०  जागा जास्त मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here