उद्धवजींची पंचायत झाली…? पवारांना भाजपात घेऊ नका..असली पापं दारात नकोत:उद्धव ठाकरे यांची जहरी टीका

0

उद्धवजींची पंचायत झाली…?
पवारांना भाजपात घेऊ नका..असली पापं दारात नकोत:उद्धव ठाकरे यांची जहरी टीका

BY Newstale
Correspondent
Murgud 25 March 2019

     अंबाबाईचे विराट रूप दर्शन मला तुमच्या रुपात झाले. मी पळवापळवी करत नाही.आता ते दिवस गेले.संघर्ष करायचा होता तेव्हा दिलखुलास संघर्ष केला.तुमच्या साक्षीने केला.तुमच्या साठी केला.पण पाठीमागून  वार करणारी आपली अवलाद नाही.वार करू तर तो समोरून करू.शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवायला लागत नाही ते आपल्या रक्तामध्ये आहेत असे प्रतिपादन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केले.
कोल्हापूर येथील भाजप शिवसेना रिपाई जनसुराज्य राष्ट्रीय समाज पक्ष,शिवसंग्राम पक्ष युती प्रचार शुभारंभ  युती प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली.
सर्व 48 जागा विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

      उद्धव ठाकर आपल्या भाषणात म्हणाले ‘शरद पवार म्हणाले होते दुसऱ्यांच्या पोराचे लाड मी का करू ?’ पवार साहेब तुमच्या परंपरा तुमच्याकडे आमच्या परंपरा आमच्याकडे. स्वतःच्या पोरांच्या लाड करण्याची वृत्ती आमच्याकडे नाही,दुसऱ्याची पोरं आम्ही पहिल्यांदा पाहतो.त्यांची मुलं आम्ही पहिल्यांदा सांभाळतो.त्यामुळेच कुठेही गेलो तरी हा जनसागर कधीही हाक मारा आमच्यासाठी उसळलेला असतो.’

आमची सभा इव्हेंटच …उद्धवजींची पंचायत झाली कशी?
उद्धव म्हणाले ‘जयंत पाटील म्हणतात सेना-भाजपची ही सभा एक इव्हेंट आहे.हो हा इव्हेंटच आहे.विजयाची मुहूर्तमेढ रोवणारा हा इव्हेंट आहे.जयंतराव तुमच्या भाग्यात असा इव्हेंट असूच शकणार नाही.
मी आणि देवेंद्रजी दोघेही कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहोत.माझी पंचायत ही झालेली आहे युती झाल्यानंतर बोलायचं काय? समोर कोण शिल्लक राहिले हेच कळत नाही ? म्हणून देवेंद्रजींना नागपूरच्या सभेत विनंती केली होती, तुमच्या सर्वांच्या साक्षीने आताही तीच विनंती करतो देवेंद्रजी कृपा करून पवार साहेबांना तुमच्या भाजपामध्ये घेऊ नका.त्याचं कारण असं काय लायकीची ही माणसं आहेत हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे.त्यांचे संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र खड्ड्यात घालण्यासाठी गेले.आज कुठेतरी हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतो राहतोय. अशा वेळी अशी पापं आपल्या दारात नकोत.त्यांची जागा त्यांना जनतेने दाखवलेली आहे.मला खात्री आहे  खासदारांची भगव्या रंगाची रांगच रांग महाराष्ट्रातून दिल्लीला जाणार आहे. कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे.

अंबाबाई कोणाला पावणार…?
कोल्हापूरच्या अंबाबाईकडे हेच मागणं केले तुझ्या हक्काचे भगवा पांघरलेले दोन्ही खासदार मला दिल्लीत पाहिजे म्हणजे पाहिजेतच.हा माझा हट्ट आहे.  मला खात्री आहे मनापासून चांगलं  मागीतलं तर देवी पावते म्हणजे पावतेच.

टायर पंक्चर ….
सेना-भाजपचे पटत नव्हतं तेव्हा विरोधकांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढल्या.अरे ज्या क्षणाला यूती झाली त्या क्षणी विरोधकांचा टायर पंक्चर झाला. त्यांचा स्वतःचा पक्ष शिल्लक राहतो की नाही अशी त्यांना चिंता पडलेली आहे. गिरीश महाजन दिसले की त्यांची धाकधूक होते.

सेना भाजप युती का केली हे सांगण्याची गरज नाही ……..
भाजप-सेना युती व्हावी ही राज्यातील जनतेची इच्छा आहे.आम्हा दोघांना एकत्र पाहण्यासाठी जनतेचा हा महासागर लोटला आहे.आम्ही कोणीही खुर्चीसाठी एकत्र आलो नाही.आम्हाला जरूर सत्ता पाहिजे सत्तेसाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. या गोरगरीब जनतेचे भले करण्यासाठी आम्हाला खुर्ची पाहिजे.देश मजबूत करण्यासाठी,देव देश आणि धर्मासाठी युती केली.लवकरात लवकर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी युती केली.अनेक वर्षे  बासनात पडलेला राम मंदिर प्रश्न आम्ही चर्चेत आणला.

    होय आम्ही हिंदू आहोत.जो धर्मा मला गाडगेबाबा,शाहू,फुले,आंबेडकर यांनी सांगितला,तो धर्म आम्हाला अपेक्षित आहे.गोरगरिबांना घर असेल,रोजीरोटी असेल,डोक्यावर छप्पर असेल,अनेक गोष्टी करण्यासाठी आम्ही युती केलेली आहे.

विरोधकांकडे चेहरा नाही…..
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले ‘हे 56 लोक एकत्र झालेले आहेत.हातात हात आणि तगड्यात तंगडं अशी यांची अवस्था आहे.जागावाटपाबाबत अजून याची भांडण चाललेली आहेत.समजा दुर्देवाने त्यांच्याकडे सत्ता गेलीच तर त्यांच्या कडे आहे कोण? शेंडाबुडखा नाही.चेहरा तर सोडूनच द्या,एक अवयव जागेवर नाही.आमच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला आहे.नरेंद्र मोदी तुमच्याकडे कोण ठरले? कोण आहे? स्वतः इच्छुक होते त्या पवारनी माघार घेतली.मायावतींनी माघार घेतली.

    पाकिस्तानचा पंतप्रधान खेळाडू आहे. खेळाडू त्या देशाचा पंतप्रधान झाला. आणि खुर्ची पाहिजे खुर्ची पाहिजे म्हणणारे व देशाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न बघणारे आमच्याकडे पवार साहेब क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले.

अजित पवार धरण कसे भरतात ?
अजित पवार धरणे कशी भरणार होते ते आठवा अशी धरणे भरणारे तुम्हाला हवेत काय? आज सुद्धा दुष्काळ भयानक आहे या दुष्काळामध्ये महाराष्ट्र शासन चांगलं काम करत आहे.अशी काम करणारी जिवाभावाची माणसं हाकेला ओ देणारी माणसं पुन्हा सत्तेवर बसवायचे नाहीत तर मग काही कपाळकरंटी माणसं सत्तेवर  बसवणार का?  असा सवाल त्यांनी केला.

माथाडी कामगारांचा नेता खासदार करून  दिल्लीला पाठवायचा आहे त्यासाठी नरेंद्र पाटील यांना मागून घेतले.

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे,शिवसेना महिला आघाडी प्रमुख डॉ.नीलम गोरे,गिरीश बापट,गिरीश महाजन,पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील,अनंत गीते,रावसाहेब दानवे,सुभाष देसाई,माजी खासदार निवेदिता माने, सुरेश हळवणकर,आम प्रकाश अबिटकर,आम.राजेश क्षीरसागर,संजय घाटगे,महादेव जानकर,विनायक मेटे,आम.अमल महाडिक, लोकसभा उमेदवार प्रा संजय मंडलिक,धैर्यशील माने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here