भाजप गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतणारे सरकार आमदार हसन मुश्रीफ यांची टीका

0

नानीबाई चिखली :काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या काळात महिलांकरिता सुरु केलेल्या अनेक योजना भाजप सरकारने बंद केल्या आहेत. सध्याचे हे सरकार उद्योगपती व भांडवलदारांच्या पाठीशी राहणारे सरकार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतणारे भाजप सरकार उलथून लावायची धमक फक्त महिलांच्यामध्ये आहे. महिला येत्या निवडणुकीत हे सिद्ध करून दाखवतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. नानीबाई चिखली (ता. कागल ) येथे आयोजित चिखली जि.प. मतदारसंघातील राष्ट्रवादी महिला व युवतीच्या विराट मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पं. स. सभापती राजश्री माने, महिला राष्ट्रवादी तालिका अध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपा कुदळे, सरपंच शीतल फराकटे, कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी जि.प. सदस्य शिल्पा खोत, बिद्रीच्या संचालिका अर्चना पाटील, माजी नगराध्यक्ष आशाकाकी माने, नाविला मुश्रीफ, अमरीन मुश्रीफ, सुमन लकडे, सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील याची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मुश्रीफ म्हणाले, गरिबांची दिशाभूल करून मोफत गॅस योजनेखाली ९३० रुपयांना गॅस दिला जात आहे. त्यामुळे महिला पुन्हा चुलीकडे वळत आहेत. आमचे सरकार सत्तेवर असल्यास महिलांची सध्याची ६०० रूपांची योजना पेन्शन २००० रुपये करण्याची शपथ मुश्रीफ यांनी घेतली. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या उद्योगव्यवसायासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात राज्यात नोकरभरती होणार असून मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून विविध पदांसाठी मोफत प्रशिक्षण देणार आहे. शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये खात्यात टाकल्यानंतर हे सरकार त्यांना १९ टक्के व्याज देणार अशी घोषणा केली आहे. यावर ते म्हणाले, सरकार जर ५० हजार रुपयांवर शेतकऱ्यांना १९ टक्के व्याज देत असेल तर आम्ही २० टक्के व्याज देऊ असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक राज्यात नंबर १ केल्याबद्दल चिखली गावाच्या वतीने आमदार मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. कुरुकलीच्या आरती पाटील या चिमुकलीने आमदार मुश्रीफ यांच्या कार्याचा गौरव करून भाषणाने सर्वांची माने जिंकली. जिल्हा बँकेचे प्रशांत नाईक यांनी जिल्हा बँकेच्या योजनांची माहिती दिली. पत्रकार दिनानिमित्त मतदारसंघातील पत्रकाराचा तसेच गैबीसाब नाईक सत्कार करण्यात आला. स्वागत सदाशिव तुकां यांनी केले तर प्रास्ताविक बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नाविक मुश्रीफ, अरुणराव भोसले, कागल शिवानंद माळी, निलेश शिंदे, रंगराव पाटील, डी. पी. पाटील, मकबूल माकानदार, नंदू पाटील, नारायण ढोले, भाऊसो पाटील, मयूर आवळेकर, आत्माराव पोवर, कुमार मोराबाळे,सदाशिव तुकान, विकास पाटील आदी उपस्थित होते. आभार बशीर नदाफ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here