महिलदिनाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये भव्य महिला मेळावा : नविद मुश्रीफ

0

 

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : महिलदिनाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहर तसेच गिजवणे- कडगाव मतदारसंघातील महिलांसाठी भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांना ह्यात सहभागी करावे असे आवाहन नविद मुश्रीफ यांनी आज ( दि. २३ ) कार्यकर्त्यांना केले.

गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात गडहिंग्लज शहर व गिजवणे-कडगाव- कौलगे मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली, हा महिला मेळावा भव्य स्वरूपात कसा यशस्वी करता येईल ह्याबद्दल नविद मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. रविवार दिंनाक ३ मार्च २०१९ रोजी म.दु.श्रेष्ठी विद्यालय संकेश्वर रोड गडहिंग्लज येथे ह्या महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती मा.आमदार हसनसो मुश्रीफ तसेच प्रमुख मार्गदर्शिका म्हणून तडाकेबंद भाषणासाठी ख्याती असलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा मा. कु. सक्षणाताई सलगर या उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीस जि. प. सदस्य सतीश पाटील, किरणराव कदम, सुरेश कोळकी, रामदास कुराडे, रमेश रिंगणे, युवराज पाटील, विठ्ठल भम्माणगोळ,नगरसेवक हारुण सय्यद, रामगोंड पाटील,महेश सलवादे, दिपक पाटील, धनाजी कळेकर,रियाज जमादार,बाळासाहेब मंचेकर,सदानंद पाटील,नेताजी पाटील,सिध्दार्थ बन्ने,अनिल गुरव, सौ.शर्मिली पोतदार, डाॕ. बेनिता डाॕयस, सौ. मंजुषा कदम, सौ.शैलजा पाटील, सौ. शिलाताई जाधव, सौ. लक्ष्मी घुगरी, सौ.रेश्मा कांबळे, सौ. आशाताई पोवार,रश्मिराज देसाई,अमर मांगले,उदय परिट, एस आर पाटील सर, शिवाजी राणे,सुजित देसाई, तानाजी मोहिते,शंकर पाटील, तानाजी राणगे,अशोक देसाई, शशिकांत देसाई, संभाजी पाटील, सुदेश चौगुले,जितेंद्र कांबळे, भिमराव राजाराम, विनायक शिंदे,संकेत परब, राम पाटील, हरीभाऊ जगताप, धुमार सर, प्रवीण जाधव, आविनाश तासिलदार, शहाजी पाटील,संग्राम पाटील,बटी पाटील,संजय गाडे,सुनिल पोवार, प्रमोद देसाई, संतोष मस्ती व संताजी घोरपडे कारखान्याचेे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here