ऊस का तोडला ? आता पुन्हा रानात उभा करून द्या..बिद्रीचा अजब कारभार

0

ऊस तोडून वाळत टाकला..तोडला तर जबाबदारी घ्या….वर पैसे का मागता…

मुरगुड प्रतिनिधी
खोडवी निडवी गेली माझी लागण शेतातच तोडून टाकली ..मला कोणी वाली राहिला नाही. तोडणी ठेकेदार वरून पैसा मागतो.तोडलेला ऊस फडातून बाहेर काढून द्यायला सांगितलं जातंय.तक्रार केली म्हणून माझा ऊस शेतात तोडून टाकलाय..पुरता वाळून चाललाय… पण आता माघार नाही..मग्रूर शेती अधिकाऱ्यांना धडा शिकवणारच..अशी भूमिका घेतली आहे भारिप बहुजन महासंघाचे कागल तालुकाध्यक्ष बाळासो भरमू कांबळे यांनी.

निवेदनाद्वारे त्यांनी आपली कैफियत मांडली असून अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचार्यांना धडा शिकण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.चिमगाव हद्दीत मानकांड माळावर त्यांचे ऊस क्षेत्र आहे.बिद्री साखर कारखान्याकडे ऊस लावणी करार केला पण रीतसर तोडच दिली नाही वारंवार खेटे घालून शेवटी आंदोलनाचा इशारा दिला.त्यानंतर कोणतीही पूर्व कल्पना न देता परस्पर माझा ऊस तोडून फडात टाकला आहे. 28 फेब्रुवारी पासून तो वाळत पडला आहे.ऊस तोडला तर तो वाहतूक करण्याची जबाबदारी कारखान्याची आहे.वारंवार विचारणा केली तरी दाद घेत नाहीत.पण आता माघार घेणार नाही.वरून पैसे देणार नाही.माझ्यासह हजारो शेतकरी या लुटमारीने पिचून गेले आहेत.या अन्याया विरुद्ध कांबळे यांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here