भोकरदन तालुक्यात गुरूवारपासून संगणक परिचालकांचे आमरण उपोषण…

0

९ महिन्यापासून थकीत वेतन, ग्रामविकास विभागाने मानधनाबाबत लावलेली  टास्क कन्फर्मेशन ही जाचक अट तसेच कंपनी व्यवस्थापनाचा कारभार या व इतर मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबरपासुन कामबंद आंदोलन सुरु केले गेले आहे याचा एक भाग म्हणुन भेाकरदन तालुक्याच्या वतीने पंचायत समितीसमोर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत आमरण उपोषणास सुरूवात  केली जाणार आहे.संग्राम प्रकल्प बंद केल्यानंतर संग्राममधील सर्व संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात सामावुन घेण्याबाबत  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून आश्वासने देण्यात आली होती. परंतु प्रकल्प सुरु होऊन १ वर्ष होत आले तरीदेखील अद्याप सर्व संगणक परिचालकांना नवीन प्रकल्पात सामावून घेण्यात आले नाही. संग्राम प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणक परीचालकांना या प्रकल्पात सामावुन घेण्यात यावे, प्रिया सॉफ्टच्या नावाखाली कपात केलेले मानधन परत देण्यात यावे. “ई-ग्राम” सोफ्टवेअर बोगस असून ते बदलुन द्यावे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या दाखल्यांमागे संगणक परिचालकांना प्रोत्साहनपर ६० % कमिशन द्याव व संगणक परिचालकांना “केंद्रचालक” म्हणून संबोधावे आणि शासकीय  कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात. या व इतर मागण्यांसाठी हे उपोषण केले जाणार आहे. यासाठी १२ आक्टोंबर रोजी भोकरदन तालुक्यातील संगणक परिचालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे तालुक्याध्यक्ष सुभाष  हजारे यांनी यावेळी केले त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष लक्ष्मण लोखंडे, सचिव संतोष झिने, मुकेश पवार, भाऊसाहेब सोनवणे, नारायण कोल्हे, आकाश शेजुळ, दगडुबा राऊत, रामेश्वर गिरणारे, दत्ता गाढे, आनंदा बावस्कर, श्रावण सोनवणे, कृष्णा गायकवाड व तालुक्यातील इतर संगणक परिचालक यावेळी उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here