भीमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री

0
PTI10_19_2016_000095A

भीमा कोरेगाव घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. घटनेची चौकशी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना,1 जानेवारी ला पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगाव येथे  किरकोळ वादातून दोन गट भिडले. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झालं. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातील विविध शहरात बघायला मिळत आहेत. 

काही जणांना नुकसान भरपाई  तर ज्या मुलाची हत्या झालीय त्यांच्या कुटुंबाला 10 लाखाची मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच सोशल मीडियातून अफवा पसरवणा-यांवरही कारवाई केली जाणार आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here