अमाप उत्साहात भादवणची महालक्ष्मी यात्रा संपन्न

0

 

भादवण (प्रतिनिधी) :

१५० पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेली भादवण (ता. आजरा) येथील महालक्ष्मी देवीची यात्रा अमाप उत्साहात संपन्न झाली. यासाठी ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली होती. मोठ्या संख्येने भाविकांनी यात्रेला हजेरी लावली होती.

भादवण गावची महालक्ष्मी यात्रा दरवर्षी साजरी केली जाते. यात्राकाळात गावकर्‍यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. यंदा यात्रेच्या नियोजनासाठी ३५ जणांची कमीटी करण्यात आली असल्याची माहीती सरपंच संजय पाटील यांनी दिली. या कमीटीमध्ये गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच तरूण मंडळे, पक्षांचे कार्यकर्ते यांचा समावेश होता. या कमीटीने यात्रेने सुरेख नियोजन केले होते.

ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेनिमित्त उत्तमप्रकारे नागरी सुविधा पुरविल्या होत्या. स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा तसेच अौषध फवारणी याकडेदेखील विशेष लक्ष दिले होते. १२ बलुतेदार, यात्रेचे मानकरी, ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांच्या देखरेखीखाली यात्रा निर्विघ्नपणे पार पाडली. विविध तरूण मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

शुक्रवार रात्री मानकरी सुतारांच्या घरात लक्ष्मीच्या मुर्तीची स्थापना केली होती. शनिवारी सकाळी पहाटे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी ही मुर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली गेली. यात्रेमुळे भादवण भाविक तसेच माहेरवासिनींनी फुलुन गेले होते.

यात्रेनिमित्त शुक्रवारी(दि.८) रोजी भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले हिते तसेच केदारी रेडेकर मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन संस्थेचे अनिरुद्ध रेडेकर तसेच अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.संजयबाबा घाटगे, शिवसेनेचे सुनील शिंत्रे,युवासेना कोल्हापूर जिल्हा विस्तारक हर्षल सुर्वे यांनीही विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तसेच रविवार (दि.१०) रोजी भादवन मराठी शाळेचे स्नेहसंमेलन व रस्सीखेच स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत व सोमवार (दि.११) रोजी भव्य डान्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व स्पर्धांना ग्रामपंचायत, विविध संस्था व मुंबईस्थित गावकऱ्यांनी हजारो रुपयांची पारितोषिक ठेवली आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजय पाटील, उपसरपंच सुनंदा कुंभार, सदस्य दयानंद पाटील, सुनंदा पाटील, छाया देसाई, बाबासाहेब कुंभार, माजी सरपंच बेबीताई लोहार, ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर तसेच सर्व कर्मचारी यांनी यात्रेसाठी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here