”उत्तम आरोग्य , शिस्तबध्द जीवनशैली, स्वयंशिस्त ही यशाची त्रि:सूत्री ” : प्रा. (डॉ.) जयदीप बागी

0

बी टेक प्रथम वर्षाच्या 10 व्या बॅचच्या तंत्रज्ञान अधिविभाग विद्याथ्यरांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी त़ंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. (डॉ.) जयदिप बागी होते.

         जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्य, शिस्तबध्द जीवनशैली, स्वयंशिस्त अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. जयदिप बागी यांनी केले. तसेच विद्यार्थ्यानी उत्तम कारकीर्द घडवण्यासाठी अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्व विकास करणे अत्यावश्यक आहे. यश हे आपोआप मिळत नाही तर ते ज्ञान संपादन इतर कैाशल्ये यांच्या आधारावर मिळवता येते.

                  तसेच प्रथम वर्ष समन्वयक प्रा. एच.पी साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. श्रीमती. एन.जे. कोतमीरे यांनी केले. कार्यमाचे सुत्रसंचालन प्रा. व्ही.के. चोपदार यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. आर. बी. रनपीसे यांनी केले. कार्यक्रमास विविध शाखांचे समन्वयक सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी प्राध्यापकांनी वसतिगृहाच्या प्रांगणात वृक्षारोपण समारंभ केला.

                  शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॅा. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ डी. टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचे प्रोत्साहन लाभले. 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here