दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना  रेडेकर फाउंडेशन मार्फत पाण्याची साथ…

0

 

अभिजीत मांगले (गडहिंग्लज) : कडलगे (ता.गडहिंग्लज)  येथे भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या बोअर वेलच्या पाण्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, रेडेकर फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडला.
कडलगे हे गाव दुष्काळ ग्रस्त गाव म्हणून शासनाकडून घोषित करण्यात आले आहे. आणि ह्या गावाच्या पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या आधी रेडेकर फाउंडेशन सरसावले. रेडेकर फाउंडेशनच्या सहकार्यातून बोअरवेलची खुदाई करण्यात आली होती आणि त्यांच्या ह्या चांगल्या कार्याचे फळ म्हणूनच की काय ह्या बोअरवेलला चांगले पाणी लागले आहे. पाण्याची सोय झाल्याने ग्रामस्थ व विशेष करून महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.आज या बोअरवेलच्या पाण्याचे पुजन जि.प.सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रमेशराव रेडेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर उपस्थित होते तसेच कडलगे उपसरपंच श्रीदेवी आनंदराव जाधव,ग्रा.प.सदस्या मंगल नाईक, शोभा यादगुडी,आपला घाटगे,ग्रामसेवक दत्ता पाटील, पोलीस पाटील शंकर केसरोळी,भीमगोंडा कळसगोंडा,दुरदूंडी खमलेटी, कुमार यादगुडी,अरूण देसाई,ईदरगुच्चीच्या सरपंच जनाबाई शंकर रेमजी,आरळगुंडी उपसरपंच संजय पाटील, खानापूर उपसरपंच युवराज जाधव, एल.टी.नवलाज,उमेश रामजी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक बी.ए.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आनंदराव जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here