बनावट व्हाटसअ‍ॅपपासून सावधान !

0

व्हाटसअ‍ॅपच्या नावाशी आणि डिझाईनशी साधर्म असे अनेक अ‍ॅप्स आहेत. यातील काहींमध्ये मालवेअर्स असल्याने यापासून बचाव करण्याचा सल्ला नेहमीच देण्यात येतो. जगभरातील अनेक युजर्स कोणतीही शहानिशा न करता व्हाटसअ‍ॅपची एक बनावट आवृत्ती इन्स्टॉल करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अपडेट व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर या नावाने हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर असून १० लाखांपेक्षा जास्त युजर्सने याला इन्स्टॉल केल्याचे दिसून येत आहे. या अ‍ॅपच्या नावासह याची डिझाईनही मूळ व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरप्रमाणेच आहे. यामुळे युजर्स कोणताही विचार न करता याला इन्स्टॉल करत आहेत. विशेष म्हणजे या अ‍ॅपच्या कंपनीचे नावही व्हाटसअ‍ॅप इंक (“WhatsApp Inc.”) असलेच देण्यात आले आहे. सोशल मीडियात चर्चा सुरू झाल्यानंतर या अ‍ॅपचे नाव बदलण्यात आले आहे.

यामुळे मूळ व्हाटसअ‍ॅपऐवजी या प्रकारचे अ‍ॅप इन्स्टॉल करू नये. कारण त्यात मालवेअर्स असण्याचा धोका असल्याचा इशारा सायबर सुरक्षातज्ज्ञांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here