बावडा कुणाची जहागीर नाही हे जमलेल्या गर्दीवरून सिद्ध होतंय – सुषमा अंधारे यांचा टोला

0

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कसबा बावडा इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ विराट सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा अंधारे, अरुंधती महाडिक, कृष्णराज महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, आजपर्यंत मी ऐकून होते की कसबा बावड्यात कुणाची तरी दहशत चालते, पण आज जमलेल्या गर्दीनं हे साफ खोटं असल्याचंं दाखवून दिलं आहे. कसबा बावडा म्हणजे कुणाची जहागीर नव्हे हेच या जनतेनं सिद्ध केलंय. बावड्यातील नागरिकांनी निर्भयपणे खासदार धनंजय महाडिक यांना दिलेला पाठिंबा म्हणजे आगामी क्रांतीची नांदी आहे अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी विरोधकांना टोला हाणला. यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, बावड्यात यायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही कारण मी वाघाचा बछडा आहे. बावड्याच्या जनतेला जर कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर महाडिक कुटुंबिय त्यांच्या पाठीशी आहे हे धमकावणाऱ्यांनी लक्षात घ्यावं.

यावेळी राजाराम कारखान्याचे अध्यक्ष हरीश चौगले, संचालक दिलीप उलपे, प्रदीप उलपे, कमलाकर नेजदार, सुरेश चौगले,माजी महापौर सुनील कदम ,प्रशांत पाटील, नगरसेविका सीमा कदम प्रल्हाद उलपे, दिलीप पाटील, विजय चव्हाण, आनंदराव चौगले, राजेश पाटील यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here