बॅ. नाथ पै विद्यालयाच्या स्वच्छतेबाबत निवेदन

0

प्रतिनिधी गडहिंग्लज :
येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या स्वच्छते संदर्भात पालक वर्गातून नाराजी असून या संदर्भात नगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले वतीने निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास पालक व महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांच्या मार्फत नवीन स्वच्छतागृहाचे उदघाटन करण्यात येईल. आणि होणाऱ्या परिणामास प्रशासक जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले कि, शाळेचे स्वच्छतागृह अतिशय अस्वच्छ आहेत. पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे सांडपाणी तुंबले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अस्वच्छतेमुळे मुले फारच कमी पाणी पित आहेत. याचाही आरोग्यावर परिणाम होत आहे. मुख्याध्यापकांकडे तोंडी तक्रारही केली आहे. त्यामुळे मुलीचे स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. मुलीची संख्या पाहता नवीन स्वच्छतागृहची आवश्यकता आहे. याठिकाणी नेहमी पाणीपुरवठाही पाहिजे. शाळेचे शिक्षण चांगले असले तरी स्वच्छतेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आहे. नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here