पनवेलमधील छमछम काही दिवस बंद

0
Optimized by JPEGmini 3.11.4.3 0x15c4e409

जयश्री भिसे

मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहरातील लेडीज बार मंगळवारी बंद केले. जोपर्यंत फायरब्रिगेडसह इतर एनओसी तसेच परवानग्या सादर केल्या जात नाहीत. तोपर्यंत बार बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे  काही दिवस छमछम बंद राहणार आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या पबला गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील लेडीज बारची  मंगळवारी सायंकाळी थेट महापालिका आयुक्तांनी तपासणी केली. त्यावेळी अनेकांकडे फायरब्रिगेडसह इतर एनओसी तसेच परवानी नसल्याचे आढळून आले. यासंदर्भातील कागदपत्रे सुध्दा बारचालकांना देता आली नाही. त्यानुसार  आयुक्तांनी संबधित बारना तात्पुरते सील ठोकण्याचे आदेश दिले. आम्ही सर्व कादगपत्र सादर करू, त्याकरीता काही दिवसांची अवधी देण्याची विनंती  मालकांनी केली. परंतु तोपर्यंत एकही बार सुरू राहता कामा नये, अशी तंबी त्यांना देण्यात आली.  सायंकाळी पाच वाजता ही  मोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये जगदंबा, चाण्यक्य, सनी, सनसिटी, महाराजा, आर्या,सप्तगिरी या लेडीज बारची तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here