पाणी पिण्याच्या प्लास्टिक बॉटल्स व ग्लासेसवर देखील बंदी आणावी-आपला आधार फाउंडेशनची मागणी.

0

जयश्री भिसे

पनवेल महानगर पालिका हद्दीतील अनेक शहरांमध्ये दिवसेंदिवस गंभीर होत असलेली कचरा सम सं सोडविणसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली. त्याचाच एक भाग म्हणून शहरात बंदी असतानाही 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडून गेल्या महिन्याभरात तब्बल अडीच हजार टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल असून त्यांच्याकडून सुमारे 30 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 16 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी दिली. प्लास्टिक मुक्त संकल्प करणारी ही पहिली महापालिका असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी पनवेल महापालिकेच सभेत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्याचे विघटन होत नसलने या पिशव्यावर काद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्या नंतरही मोठ्या प्रमाणात या पिशव्याची विक्री तसेच वापर सुरु असून शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात या पिशव्याचे प्रमाण लक्षणिय आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणणसाठी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मात्र आज कचरा समस्येमध्ये मिनरल वॉटर ज्या बाटल्या प्लास्टिकच्या असतात याचाही मोठा हातभार आहे. पनवेल महानगर पालिकेमध्ये अशा मिनरल वॉटर व प्लास्टिक पाणचे ग्लास बनविणार अनेक छोट्या मोठ्या कंपन्या किंवा कारखाने गल्लीबोळात तयार होत आहेत. प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याने प्लास्टिक बॉटल बनविणाऱ्या कंपन्या व प्लांट यांच्यावर देखील कारवाई करावी व प्लास्टिक बॉटल देखील पनवेल शहरातून हद्दपार करावत जेणेकरून कचरा समस्या देखील वाढणार नाही आणी पनवेलच्या नागरिकांचे आरोग्य देखील सुधारेल. भारतात बऱ्याच काळापर्यंत पाणपोई ही संकल्पना अस्तित्वात होती. पण पाणपोई ही काही पायाभूत सुविधा या सदरात येणे शक्य नाही. शहरांतर्गत किंवा जवळपास पाणपोई शक्य आहे पण एका गावाहून दुसर गावी जाताना निर्जन रस्त्यावर हे कसे शक्य आहे ? तेथे पाणी कोण व कसे पोचवणार ? पाणचा दर्जा हा विष तर दूरच राहिला. नेमके याच कारणांमुळे बाटली बंद पाणी गरजेचे झाले आहे. पण हे ही तितकेच खरे आहे की त्यामुळे प्लास्टिकचा अती वापर व कचरा सम स वाढली आहे. तसेच भूजलाचा अर्मयाद उपसा ही पण समस्या निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर बाटली बंद पाणी हा एक धरले तर चावते, सोडले तर पळतेय असा मुद्दा झालेला आहे. प्लास्टिक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असते असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे प्लॅस्टीक आपल्या आयुष्यातून लगेचच पूर्णपणे हटणे अवघडच आहे. आपण प्लास्टिकच्या पिशव्या, विविध भांडी आणि इतरही अनेक वस्तू प्लास्टिकच वापरतो. मुख्यतः पाणी पिणच्या बाटल्या या प्लॅस्टीकच्याच असतात. मात्र त्यामुळे आपल्या आरोगयाला त्रास होऊ शकतो. आता प्लास्टिकच बाटलीतून पाणी पियाल्याने नेमके कोणते त्रास होतात त्याविषयी :
1. आपण बाहेर पडताना बऱ्याचदा पाण्याची बाटली सोबत घेतो पण ही बाटली प्लास्टिकची असते. या प्लास्टिकची गुणवत्ता चांगली नसलस तचा आरोगवर विपरीत परिणाम होतो. 2. विकत मिळणार प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोगसाठी आणखीनच हानिकारक असते. विकतच्या बाटल्या कमी दर्जाच्या असल्याने त्यातून पाणी पिऊ नये. 3. प्लास्टिकची बाटली सूर्यप्रकाश, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यास त्यातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात. ही द्रव्ये पाण्यात मिसळली गेल्याने ते पाणी पिणे चांगले नसते. 4. पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने तार केलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपुक्त आहेत. मात्र यामध्ये थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच ते वापरणे सुरक्षित आहे. 5) मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये. तसेच आपली नियमित पाणची बाटली कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशरने स्वच्छ करत रहावी. या प्रकारचे दुष्पपरिणाम प्लास्टिक बॉटल किंवा ग्लासमध्ये पाणी पियाल्याने होत असून प्लास्टिक बॉटल ह्या ड्रेनेज गटारे आदीमध्ये अडकल्यास बहुतांश कचरा जमा होतो व परिसरात दुर्गंधी पसरते त्यासाठीच प्लास्टिक बॉटल व ग्लास यांच्या कारखाने व कंपन्या यांच्यावर देखील कारवाई करून बंदी आणणे काळाची गरज आहे याची जाणीव ठेवून आपला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापौर कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत यांना दिले आहे. नुकताच पर्यावरणमंत्री यांनी देखील प्लास्टिक बाटल्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील प्लास्टिक बाटल्या व ग्लास बनविणाऱ्या कंपन्यांवर छोट्या मोठ्या व्यापाऱ्याप्रमाणे धडक कारवाई होऊन कंपन्या बंद करण्याची गरज आहे. निवेदन देताना आपला आधार फाउंडेशनचे अध्यक्ष केवल महाडिक, सदस्य किरण घरत, अमित पंडित, रुपालीताई शिंदे, नंदिनी गुप्ता, ऍड. हेमा गोतमारे व जयंती बिश्वास आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here