बँकांमधील भरती प्रक्रिया – संधी आणि स्वरूप

0

प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील भरती प्रक्रिया IBPS मार्फतच राबविली जाते. याही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. यामध्ये केंद्र व राज्य सरकारचे 85% भागभांडवल असते. या बँकांमध्ये पुढील पदासाठी परीक्षा घेतली जाते.1. गट ‘अ’ अधिकारी (SCALE – 1,2, 3)

2. गट ‘ब’  अधिकारी – कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant

गट ‘अ’ अधिकार्‍यामध्ये scale-1 अधिकारी, scale -2 अधिकारी (सर्वसाधारण बँकिंग अधिकारी –General Banking officer)

विशेषज्ञ अधिकारी (specialist officer – scale – 2)-माहिती तंत्रज्ञान अधिकारी, सनदी लेखापाल, विधी अधिकारी, कोष प्रबंधक, विपणन अधिकारी, कृषी अधिकारी) scale-3 अधिकारी यांचा समावेश होतो. 

शैक्षणिक पात्रता :

 1. ऑफीस असिस्टंट (कार्यालयीन सहाय्यक)

1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

 2. RRB ज्या राज्यात आहे त्या राज्याच्या अधिकृत भाषेचे ज्ञान आवश्यक/अनिवार्य. 

3. संगणकाचे ज्ञान आवश्यक.

 2. स्केल – 1 अधिकारी : (Officer scale-1)

1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परंतु खालील विषयातील पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल –Agriculture, Horticulture, Forestry, Animal Husbantary, Veternary science, Agn. Engn., Pisciculture, Agri. marketing & cooperation, Information Technology, Management, Law, Economics, Accountancy.

 2. RRB ज्या राज्यात आहे त्या राज्याच्या अधिकृत भाषेचे ज्ञान आवश्यक.

 3. संगणक ज्ञान आवश्यक. 

 3. स्केल – 2 अधिकारी : (जनरल बँकिंग ऑफिसर)

1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण. पुढील विषयातील पदवीधारांना प्राधान्य दिले जाते. Banking, Finance, Marketing, Agriculture, Horticulture, Forestry, Animal Husbantary, Veternary science, Agn. Engn., Pisciculture, Agri. marketing & cooperation, Information Technology, Management, Law, Economics, Accountancy.

 2. कोणत्याही बँकेत किंवा वित्त संस्थेत अधिकारी म्हणून कामाचा 2 वर्षांचा अनुभव. 

 4. स्केल – 2 अधिकारी (विशेषज्ञ अधिकारी –specialist officer)

 1. Information Technology Officer :

1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पुढील विषयातील पदवी – – Electronics, Communication, Computer Science, Information Technology –किमान 50% गुणांसह उत्तीर्ण. याशिवाय पुढील विषयातील ज्ञान असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. 

certificate in ASP, PHP, C++, Java, VB, VC, OCP, etc.

2. बँकिंग क्षेत्रातील कामाचा 1 वर्षाचा अनुभव. 

 2. सनदी लेखापाल (CA) :

1. Institute of charteres Accountants of India ची CA ची सनद. 

2. बँकिंग क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव.

 3. विधि अधिकारी (Law officer) :

1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी (LL.B) किमान 50% गुणासह उत्तीर्ण. 

2. किमान 2 वर्षे वकिलीचा अनुभव किंवा बँकिंग अगर वित्तीय संस्थेत किमान 2 वर्षे कामाचा अनुभव. 

 4. कोष प्रबंधक (Treasury Manager) :

1. Instituter of chartered Accountants ची CA ची सनद किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून Finance या विषयातील MBA.
2. बँकिंग क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव.

 5. विपणन अधिकारी 

1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण. परंतु पुढील विषयातील पदवी/पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येते. – (स्केल – 2 अधिकारी – जनरल बँकिंग ऑफिसरचे विषय टाकणे)

2. बँकिंग/वित्त संस्थेत अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव.

 * वयोमर्यादा (सर्वसाधारण प्रवर्गासाठी)

अ. ऑफीस असिस्टंट (कार्यालयीन सहाय्यक) – किमान 18 वर्षे कमाल – 28 वर्षे. 

ब. ऑफीसर स्केल – 1 – किमान – 18 वर्षे कमाल – 30 वर्षे. 

क. ऑफीसर स्केल – 2 – किमान – 21 वर्षे कमाल – 32 वर्षे

ड. ऑफीसर स्केल – 3 – किमान – 21 वर्षे कमाल – 40 वर्षे. 

 पुढील प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथीलक्षम आहे –

1. अनु. जाती जमाती – 5 वर्षे. 

2. इतर मागास वर्ग – 5 वर्षे. 

3. दिव्यांग/अपंग – 10 वर्षे. 

4. माजी सैनिक – 5 वर्षे. 

5. विधवा, परितक्त्या – 9 वर्षे. (फक्त ऑफीस असिस्टंट पदासाठी)

6. जम्मू-काश्मीर रहिवासी – 5 वर्षे. 

7. 1984 दंगल पीडित – 5 वर्षे. 

 * परीक्षा योजना –

सर्व पदांच्या परीक्षा ‘online’ संगणकावर घेतल्या जातात. 

– सर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या असून नकारात्मक गुणांकन – 0.25 इतके आहे. 

– सर्व परीक्षांचे प्रश्‍न हिंदी व इंग्रजी भाषेत असतात. अपवाद हिंदी भाषा, इंग्रजी भाषा. त्यांचे प्रश्‍न फक्त त्याच भाषेत असतात. 

* – चाचणीमध्ये चाचणी 4 (अ) व चाचणी 4 (ब) यापैकी एकाच चाचणीची निवड करावी लागते. 

 1. ऑफीस असिस्टंट : 

ऑफीसर स्केल १ :

ऑफीसर स्केल २ (General Banking Officer)

ऑफिसर स्केल २ (विशेषज्ञ अधिकारी) : 

ऑफीसर स्केल ३ :

* मुलाखत –

मुलाखत 100 गुणांची असते. मुलाखतीत किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य (मागासवर्गीयांसाठी – 35%) आहे. मुलाखतीमध्ये स्थानिक भाषेच्या ज्ञानाचीही चाचणी घेतली जाते.

* अंतिम निकाल – 

ऑनलाईन परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण याच्याआधारे अंतिम निकाल जाहीर केला जातो. लेखी परीक्षा व मुलाखत यांचे भारांक प्रमाण 70:30 इतके असते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here