भडगावला दारूबंदीसाठी आंदोलनाचा इशारा

0

प्रतिनिधी गडहिंग्लज : शहरालगत असणाऱ्या भडगाव येथे जनसभेत ठराव होऊनही अद्याप दारूबंदी झाली नाही. गावातील दारू दुकाने गावाबाहेर हलवून दारूबंदी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
महादेव खमलेट्टी, राकेश कोडोली, बसवराज अमाते, सचिन हरळीकर, सागर नेसरी, प्रकाश धनवडे, महेश अमाते, साईनाथ कोरी, कृष्णा बाडकर. इराप्पा खमलेट्टी, काशिनाथ रेगडे यांच्यासह अन्य नागरिकांनी सादर निवेदन सरपंचांना दिले आहे. भडगाव ग्रामपंचायतीच्या जनसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर झाला आहे. वेळोवेळी ग्रामसभेतही याची मागणी केली आहे. मात्र याचा कोणताच निर्णय झाल्याचे दिसत नाही. दारूबंदीच्या नावावर ग्रामपंचायत दिशाभूल करत आहे. ही जनतेची फसवणूक थांबविणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीची कार्यवाही त्वरित करावी अन्यथा सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील व याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, असे सुचविले आहे. दारूबंदी किती दिवसात करणार ? याची माहितीही मागितली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here