सिरसंगीत सोमवारी बाळूमामा भंडारा उत्सव

0

वार्ताहर किणे
सिरसंगी येथे त्रिमूर्ती सदगुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दि. १४ ते १८ जानेवारीपर्यंत बाळूमामा भंडारा उत्सव साजरा होणार आहे.
या उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहाची कर्जत (जि. अहमदनगर) येथील दत्तात्रय महाराज व पाटील महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिरसंगी येथील ह. भ. प. बाळासाहेब सुतार, पुणे येथील कबीर महाराज अत्तर, आळंदी येथील ह. भ. प. पुरुषोत्तम पाटील, ह. भ. प. भागवंताचार्य सुनीताताई आळंदीकर, ह. भ. प. भागवंताचार्य पुष्पाताई जावरे यांचा प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि. १७ रोजी आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ येथील आप्पासो डोणे यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम त्याचबरोबर दुपारी ११ ते ३ या वेळेत दि. १८ रोजी कर्जत अहमदनगर ह. भ. प. रविंद्रनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळू दळवी यांनी संतितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here