बाळेघोल प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

0

 

कागल (प्रतिनिधी) :

बाळेघोल (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेला शिक्षकांची वारंवार मागणी करुनही शिक्षण विभागाने पुरेसे शिक्षक दिले नाहीत. यामुळे पालकांनी आक्रमक होत सोमवारी शाळेला टाळे ठोकले. 9 फेब्रुवारी रोजी पालकांनी शाळेला कुलुप ठोकण्यासंदर्भात पंचायत समितीली निवेदनाद्वारे इशारा दिला होता. अपेक्षित कार्यवाही झाली नाही. म्हणून वैतागलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले.

शाळेच्या वर्गखोल्याना कुलुप लावल्याने मुले मैदानावर पुन्हा शाळा सुरू होण्याच्या अपेक्षेने वाट पहात उभी होती. तर शिक्षक पालक व अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. गेली दोन वर्षापासून शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे कार्यरत असलेले एका शिक्षकाची बोळावी येथे बदली झाली. तर एक शिक्षक मयत झाल्याने पद रिक्त झाले.
याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीला मागील वर्षी १२ नोव्हेंबरला निवेदन दिले. निवेदनाव्दारे कायमस्वरूपी शिक्षकाची मागणी असताना शिक्षण विभागाने केंद्रशाळा तमनाकवाडा येथील एका शिक्षकाची तोंडी आदेशाने नियुक्ती केली. मात्र केंद्रशाळेतही शिक्षकांची कमतरता असल्याने हे शिक्षक सध्या केंद्र शाळेत रुजु आहेत.

या शाळेत १ ते ७ वी असे वर्ग आहेत. सात वर्गाना तीन शिक्षक कार्यरत असुन एक कामानिमित्त बाहेर असतात. आणखी चार शिक्षकांची आवश्यकता आहे. गेली दोन वर्ष मागणीकडे शिक्षण विभागाने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थानी अखेर शाळेला टाळे ठोकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here