बाळेघोल आंबेओहळ पुल वाहतुकीस धोकादायक,पुल नव्याने उभारण्याची मागणी

0

 

 

सेनापती कापशी : बाळेघोल ता.कागल नजीकच्या बाळेघोल – हणबरवाडी दरम्यान आंबेओहळ ओढ्यावर असलेला पुल नव्याने उभारण्याची मागणी बाळेघोल, हणबरवाडी ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.हणबरवाडी,बेरडवाडी व गडहिंग्लज ,कर्नाटक कडे जाण्यासाठी हा पुल उपयुक्त आहे. पुल 20 वर्षापूर्वी उभारण्यात आला आहे.
सध्या या पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे.सिमेंटचे कठडे तुटलेले आहेत.लोखंडी ग्रील गंजून निखळले आहेत. पिलर काँक्रीट खराब होवून जीर्ण झाले आहेत.संरक्षण कठड्याना वाहनांची धडक होवुन कठडे तुटले आहेत.वाहतूक जीवघेणी आहे. तर अवजड वाहतूक संभाव्य धोका ओळखून बंद करण्याची सक्ती करावी अशीही मागणी आहे.वाहतुकीने कधीही पूल ढासळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पूलाची लांबी 76 फुट व रुंदी 18 फुट आहे. यामुळे एका वेळी एक वाहन ये- जा होते.कधी पुल ढासळेल आणि अपघात घडेल याची खात्री देता येत नाही.कमी उंची,अरूंद पुल, तीव्र उतार, अधिक खोली व नागमोडी वळण असल्याने येथे वारंवार अपघात होतात.गत उसतोड हंगामात यापुलावर ट्रँक्टर ,ट्राँलीचे अपघात घडले आहेत.वारंवार किरकोळ अपघात घडत असले तरी आगामी पावसाळ्यात पुलावरून वाहतूक धोकादायक ठरणार आहे. या पुल बांधकाम संदर्भात जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सरपंच सावित्री खत्तकले,उपसरपंच सुनिल कोले,कागल पं.स.माजी सभापती कमल पाटील,माजी सरपंच शामराव पाटील यानी पुल बांधकामाची लेखी मागणी केली आहे. मात्र निधी अभावी मागणी रखडल्याचे समजते.

फोटो ओळ
कोसळयाण्याच्या स्थितीतील पुल.व पुुलावरुन कोसळलेला ट्रँक्टर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here