शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0

 

मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा करणार असून मंगळवारी (दि.१२) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीच्या आत पैसे जमा करण्याचा निर्देशही देण्यात आले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात २९०० कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात २००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबबरोर, पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ८० चिकित्सालये स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी फ्री होल्ड करण्यास मान्यताही या बैठकीत दिली आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात ०५ : ५० : ४५ याप्रमाणे सुधारणा करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here