राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

0

राजू म्हस्के

            सातारा येथे होणाऱ्या कनिष्ठ गटातील मुलींच्या व मुलांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघाची घोषणा औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेतून करण्यात आली.

           विविध वजन गटात विजयी होऊन औरंगाबादच्या संघात निवडण्यात आलेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. मुले- (४६-४९ वजन गट)-कृष्णा राऊत, (५२-५६ वजन गट)-सुरज साळवे, (५६-६० वजन गट)- मौसीन शेख, (६४-६९ वजन गट)-उदयराज पवार, (६९-७५ वजन गट)-सागर गुसिंगे, (७५-८१ वजन गट)- सोहम मुंगीकर, (८१-९१ वजन गट)-हृषीकेश महाजन, (९१+ वजन गट)-रोहन टाक. मुली- (५४-५७ वजन गट)-श्रुती लोहार, (६४-६९ वजन गट)- सानिया नटू. टीम कोच- राहुल टाक.   

         संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, उपाध्यक्षा केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे आणि कोषाध्यक्ष प्रा.प्रदीप खांड्रे यांनी शुभेछया दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here