पुणे महापौर चषक हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

0

प्रतिनिधी- राजू म्हस्के

औरंगाबाद – शिवछत्रपती क्रीडा नगरी, बालेवाडी, पुणे येथे हॉकी महाराष्ट्राच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “पुणे महापौर चषक हॉकी स्पर्धेसाठी” औरंगाबादचा संघ हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी जाहीर केला आहे.कुणाल वानखेडे(कर्णधार), ललित धरवाई, सचिन चौधरी, रोहित ढोकरत, सचिन मगरे, करण ठोसरे, नीरज शिरसाठ, महेंद्र चाकाले, सत्यम निकम, अश्विन गुंडे, नवीन कथावते, दानिश शेख, वैभव माटे,समीर शेख, आमीड खान, प्रणय तांबे, अक्षय दारेलु, आकाश जमधडे. कोच/ मॅनेजर- समीर शेख.

ज़िल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव, कमांडर विनोद नरवडे, डॅनियल फेर्नांडीस, उद्योजक दिनेश गंगवाल, डॉ. प्रदीप खांड्रे, शेख साजिद, प्रा. शामसुंदर भालेराव यांनी हॉकीपटूंना पुढील वाटचालीसाठी शुभेछया दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here