औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेलेंनी केला संकल्प पुर्ण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनापासून मनपाची शहर बससेवा सुरू

0

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनापासून मनपाची शहर बससेवा सुरू करण्याचा संकल्प केला होता. केलेल्या संकल्पानुसार  एसटी महामंडळाच्या सहकार्याने शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनापासून शहर बससेवेला सुरुवात केली.  टी. व्ही. सेंटर येथून शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते भगवी झेंडी दाखवून शहर बससेवेस सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर, एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक आर. एम. पाटील यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here