एटीएम मशीन चोरणा-या टोळीला बेड्या

एकूण १५ मिनिटांत ७ मशीनवर डल्ला मारणारे आरोपी ताब्यात

0

प्रतिनिधी – पुनम पोळ

पुणे : हॉलिवूडचा चित्रपट फास्ट अॅन्ड फ्युरियस चित्रपट पाहून त्यामधील आयडीया प्रत्यक्षात वापरत अवघ्या अडीच मिनिटांत एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केलंय.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मोरे, महमुद बेग जमादार,मोहीद्दीन जाफर बेग जमादार , दादापीर मकदुमदार तहसीलदार आणि मलीकजान कुतुबुद्दीन हनिकेरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

काही महिन्यांपूर्वी  मध्ये पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात असलेले १६ लाख ४८ हजार रुपयांची रोकड असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी चोरून नेले होते. त्याचा तपास करत असताना, कोंढवा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड आणि त्यांच्या सहका-यांनी चोरीचा मास्टर माइंड दिलीप मोरे याला कोल्हापुरमध्ये ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या साथीदारांची नावे सांगितली.

चौकशीत या आरोपींनी धक्कादायक खुलासा केला. एटीएम चोरी करण्यापूर्वी सदरील टोळी एटीएमच्या परिसराची रेकी करत असत. त्यानुसार पुढील नियोजन करून, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने अवघ्या अडीच मिनिटांत मशीन गाडीत टाकून पसार होत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

त्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला असून, चोरी करण्यासाठी त्यांनी विशिष्ठ स्कार्पिओ मोटार सज्ज केली होती. त्यामध्ये तंत्रज्ञान वापरून मॅकनिझम यंत्रणा तयार केली होती. त्याचबरोबर एटीएम मधील कॅमेऱ्यांच्या वायर कापून, अडीचाव्या मिनिटाला ते मशिनसह पसार होत असल्याचे समोर आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here