तरुणावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला

पुण्यातील शिवणे येथील घटना

0

पुणे – शिवण्यात राहणाऱ्या एका तरुणावर चार ते पाच जणांच्या एका टोळक्याने कोयता, बांबूच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

विनय साळवे याच्यावर हा हल्ला झाला असून त्याने हल्लेखोरांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
यातील विनय साळवे हा इंगळे कॉर्नर येथील मॉन्जीनीज केकच्या दुकानासमोर गेला असताना, जुन्या भांडणाच्या कारणावरून चार ते पाच जणांच्या टोळक्याने विनय साळवे याच्यावर कोयता, बांबूच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. यात विनय गंभीर जखमी झाला असून पोलीस पुढील तपस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here