ज्योतिषानुसार हे लोक बनू शकतात इन्कमटॅक्स ऑफिसर्स, ऑडीटर्स, बँक मॅनेजर, सी.ए.

0

इन्कमटॅक्स ऑफिसर्स ऑडीटर्स, बँक मॅनेजर, सी.., या क्षेत्रा मध्ये आपणास प्रगती करण्यासाठी कुंडली मध्ये हे योग आहेत का हे पाहत असताना सर्व प्रथम राशींचा विचार केला असता, पृथ्वी व वायू तत्वाच्या चंद्रराशी किंवा लग्नराशी असावी त्या योगकारक ठरतात. वृषभ, कन्या, मकर या पृथ्वीतत्वाच्या व मिथुन तुला कुंभ या वायूतत्वाच्या राशी या योगासाठी योगकारक ठरतात. तसे पहिले तर उत्तम गणित तज्ञ याच लग्नराशीवर जन्माला येतात.

मेष, वृश्चिक या चंद्र राशी किंवा लग्न राशी असलेल्या लोकांना गणित व आकडेमोड हे मनापासून आवडत नाही. पण गंमत अशी आहे कि या राशींचा स्वामी मंगळ हा ग्रह गणित शास्त्रासाठी महत्वाचा आहे.

ज्यावेळी आपण ग्रहांचा विचार करतो त्यावेळी बुद्धीचा कारक असलेला ग्रह बुध हा गणित तज्ञासाठी मुख्य कारक आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण बुध ग्रहाचा विचार करतो त्यावेळी तो कुंडलीतील दुसऱ्या / तिसऱ्या / सहाव्या व दहाव्या स्थानामध्ये पृथ्वी किंवा वायू राशी मध्ये जर असेल तर तो खूप महत्वाचा ठरतो. बुध हा रवी बरोबर सहसा पत्रिकेमध्ये आपल्याला युती मध्ये पहावयास मिळतो पण हा बुध जर रविपासून अलग म्हणजे एकटा तिसऱ्या, पाचव्या व दहाव्या स्थानी असेल तर विशेष महत्वाचा समजावा.

एक उत्तम गणित तज्ञ होण्यासाठी जन्मकुंडली मध्ये मंगळ बलवान असून  तो शुभस्थानामध्ये शुभराशीमध्ये असावा व मंगळबुध युती किंवा हे दोन ग्रह एकमेकांच्या शुभयोगात शुभदृष्टीत असावे लागतात.

 

ग्रहांचा विचार केला तर गणित जमण्यासाठी बुध ग्रहास मंगळा बरोबर शनीचीहि साथ लागते त्यामुळे मंगळ बुध व त्याचबरोबर शनी हा सर्वात महत्वाचा ग्रह आहे. उत्तम अर्थशास्त्रज्ञ होण्यास शनी अनुकूल म्हणजे वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर, कुंभ ह्या राशीमध्ये किंवा पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या सहाव्या, दहाव्या, अकराव्या या स्थानी बुधहर्षल अगर चंद्राचे शुभ दृष्टीत असावा खरे तर उत्तम आकडेमोड गणित हिशोब या करिता हर्षलची गरज नाही, परंतु नवीन शास्त्रीय शोध व कोणत्याही विषयाचे संशोधन करणे हा स्वभाव गुणधर्म हर्षलचा आहे.

गणित विषयामध्ये जे लोक मोठ्या दर्ज्यावर म्हणजे उच्च अधिकारावर जातात व जे अधिकारी बजेट, सरकारी अर्थमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये, बँका, रिझर्व बँका, अकौंटन्ट जनरल ओडीटर ऑफिस मध्ये मोठ्या दर्जावर असतात. त्यांच्या पत्रिकेमध्ये शनीचे प्राधान्य असावे लागते.

जर कुंडलीमध्ये मंगळ निर्बली असून तो बुध शनी हर्षल यांचे दृष्टीत असेल  किंवा नेपच्यून प्रतियोगात, युतीत असेल तर  अशी व्यक्ती उत्तम गणिततज्ञ होऊ शकत नाही. प्रत्येक व्यवसायामध्ये अकौंटन्सी लागते परंतु कोणत्या व्यवसायामध्ये आपण काम केले म्हणजे आपला भाग्योदय होईल हे प्रत्येकाने आपल्या कुंडलीवरुन ठरवावे.

१.                     कुंडलीमध्ये मंगळ बलवान असेल तर लोखंड पोलादाचे कारखाने लष्करी खाते यामध्ये यश मिळते.

२.                     शनी बलवान असेल तर बँक, रिझर्व बँक, सरकारी कचेऱ्या यामध्ये यश मिळते.

३.                     बुध बलवान असेल तर सर्वसाधारणपणे देवघेवीचे व्यवहार, स्टेशनरीचे व किराणा व्यापारी अडत दलालीची दुकाने या मध्ये यश मिळते.

४.                     गुरु बलवान असेल तर विश्वविद्यालय शिक्षण संस्था व सार्वजनिक संस्था या मध्ये यश मिळते.

५.                     शुक्र बलवान असेल तर सोने चांदी रत्ने उंची वस्त्रे, करमणुकीचे स्थळे या मध्ये यश मिळते.

६.                     हर्षल बलवान असेल तर मोटारीचे कारखाने, रेल्वेची वर्कशॉप, आगबोटीचे कारखाने.यामध्ये यश मिळते

७.                     प्लुटो बलवान असेल तर रेडीओचे सर्व कारखाने या मध्ये नोकरी करावी यश मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here