अरुण घायवट यांना डी. लिट.(मानद) पदवी बहाल

अंतरराष्ट्रीय विश्लेषक डॉ. नीना यांच्या हस्ते पदवी बहाल

0

प्रतिनिधी- योगेश चांदेकर

पालघर- थाईलँडची राजधानी बँकॉक येथे पार पडलेल्या कला-संस्कृती आदान -प्रदान,सामाजिक न्याय,महिला सक्षमीकरण,व युवक कल्याण आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेमध्ये जागतिक प्रतिभाशक्ती एकत्रीकरणाच्या विचारप्रणाचे iiou च्या विश्व संमेलनात ग्रँथालयीन अभ्यासक व संशोधक श्री अरुण घायवट यांना इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन युनिव्हर्सिटी(यु.एस. ए,)मधून यावर्षी मानद डि. लिट.हि पदवी बहाल करण्यात आली.

बँकॉक येथील पर्यटन विभागाच्या अंतरराष्ट्रीय विश्लेषक डॉ. नीना यांच्या हस्ते हि पदवी प्रदान करण्यात आली. या संमेलनाचे आयोजन आय.आय.ओ. यु.(यु.एस.ए.) व डब्लू .टी. बी.आर. वर्ल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड डी. ए.सी., दुबई अक्रेडिटेशन सेंटर आणि आर.ओ. एच. एस.मॅनेजमेण्ट सिस्टम यांनी केले होते.यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ.श्री.कौशिक गायकवाड डॉ.दीपक परब,कुलगुरू डॉ.के. आर.महाजन मार्गदर्शक डॉ.बी. एन.खरात(ओरोस महाविद्यालय मुंबई विद्यापीठ) अमरावती महाविद्यालय डॉक्टर अंजली ठाकरे नागपूर विद्यापीठातील अलका सप्रे जेष्ट साहित्यिक डॉक्टर अ. ना. रसनकुटे उपस्तित होते. यावेळी भारतातील दहा व्यक्तींना वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रातील डॉक्टरेट देण्यात आली. ग्रंथालयाचे सामाजिक महत्व आणि त्याचा चिकित्सक अभ्यास या विषयातील प्रबंधासाठी याना सन्मानाची ‘मानद’डि. लिट.हि पदवी प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here