अपहरणाच्या तयारीत असणारी सशस्त्र टोळी मिरजेत जेरबंद..

चार जणांना अटक करत दोन पिस्तूल व सात जिवंत काडतूस जप्त. मिरजेच्या वाहुतक पोलिसांच्या तावडीत सापडले कर्नाटक मधील सराईत गुन्हेगार. मात्र दोघे जण फरार ...

0

मिरजेत वाहतूक पोलिसांनी कोल्हापूर येथील व्यापाऱ्याच्या अपहरणाच्या तयारीत असणाऱ्या एका सशस्त्र टोळीला जेरबंद केले आहे.कर्नाटक राज्यातील चार सराईत गुन्हेगारांना यावेळी अटक करत त्यांच्याकडून २ पिस्तूल व सात जिवंत काडतूस आणि स्विफ्ट गाडी जप्त केली आहे.यावेळी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

सांगलीच्या मिरजेमध्ये आज दुपारी एसटी स्टॅन्ड नजीकच्या प्रेमनगर येथे वाहतूक पोलीस शाखेच्या कडून तपासणी सुरु असताना कोल्हापूरच्या दिशेने मिरजेकडे येणारी कर्नाटक पासिंग असणारी स्विफ्ट गाडी अडवण्यात आली.यावेळी वाहतूक पोलीस कर्मचाऱयांनी गाडीची डिकी उघडण्यास सांगितल्या नंतर गाडीत असणाऱ्या पाच जणांनी गाडीतून उडी मारून पळवून जाण्याचा प्रयत्न केला.यामुळे पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी पळवून जाणाऱयांचा पाठलाग करत तिघा जणांना पकडले.आणि गाडीच्या डिकीची तपासणी केली असता यावेळी डिकीत असणाऱ्या एका सॅक मध्ये दोन पिस्तूल आणि सात जिवंत काडतूस आढळून आल्या,या मधील एक पिस्तूल हि विदेशी बनावटीचे आहे.तर सॅकची पूर्ण झडती घेतल्यानंतर त्यामध्ये चार तोंडाला बांधण्यात येणारे मास्क ही सापडले.यानंतर वाहतूक पोलिसांनी शशी रामचंद्र मूढेवाड , वय 34 , साईनाथ लालाप्पा बनसोडे वय-30,रमेश बहिरापा बनसोडे वय – 30 , संजू चण्यापा चौधरी (चालक) वय 28 सर्व जण राहणार चडचण ,तालुका इंडी , जिल्हा विजापूर ,कर्नाटक यांना अटक केली . अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली आहे. तर हे सर्व जण कोल्हापूरच्या वडगाव येथील एका व्यापाराच्या अपहरणासाठी गेले होते. मात्र बेत फसल्याणे पुन्हा गावी मिरजेमार्गे जात होते. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे . तर आज वाहतूक पोलिसांच्या मुळे याबाबत अधिक तपास महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून सुरु आहे . तर वाहतूक पोलिसांच्यामुळे एक मोठा गुन्हा होण्या आधी उद्धवस्थ झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडून वाहतूक पोलिसांच्या टीमला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here