कागल तालुका देशात अव्वल व्हावा यासाठी प्रयत्नशील : आ. मुश्रीफ

0

कागल (प्रतिनिधी) :

कागल तालुक्याच्या चिकोत्रा खोऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारा अशी अर्जुनवाडाच्या भैरवनाथ देवलयाची प्रचिती आहे. मी देवाकडे माझ्यासाठी काही मागणार नाही. तालुक्यातील जनता सुखी राहत कागल तालुक्याचा विकास व्हावा व देशात अव्वल क्रमांकावर कागल तालुका यावा हिच भैरवनाथ चरणी प्रार्थना आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. ते अर्जुनवाडा (ता. कागल) येथील भैरवनाथ व मरगुबाई मंदिराच्या पायखुदाई कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकचे संचालक भैया माने होते.

यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, अर्जुनवाडा या गावासाठी मी कधी मतांचा विचार केला नाही. हे गाव विकासासाठी एकत्र आलेले आहे. या गावच्या विकासासाठी मी कायम तत्पर आहे. आजपर्यंत कोणतेही गट – तट,जात-पात न पाहता सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. यामुळेच मला वीस वर्ष आमदार व मंत्री म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे . समाजातील दुर्लक्षित घटकापर्यंत शासनाच्या अनेक योजना पोहोचवल्या आहेत. माझ्या घरी कुणीही व कधीहि यावे, सर्वांच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायमच उघडे आहेत. कोणत्याही सर्वसामान्यांच्या कामासाठी फोन करणे व पत्र देणे हा माझा अंगाराच आहे असेही ते यावेळी म्हणाले

प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, देव-देवता आणि मंदिरे ही बहुजन समाजाची श्रद्धास्थाने आहेत. बहुजन समाजाच्या श्रद्धा जोपासण्यासाठीच आमदार हसन मुश्रीफ यांनी पाचशेहून अधिक मंदिरे बांधली आहेत. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने बहुजनांचे नायक आहेत.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे,अर्जुनवाडचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच सोनाबाई पाटील, भारत सातवेकर, जी. जी. पाटील, भारत चोपडे, दत्तात्रय तिप्पे, आर. के. लाडगावकर, , ज्योती मुसळे, भिमराव ढोले आदी ग्रामस्थ कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here