गडहिंग्लज मध्ये भव्य “अर्जुन श्री’ देखणी म्हैस स्पर्धा

0

गडहिंग्लज – शेतकऱ्यांच्या पशुप्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी(ता.११) अर्जुन श्री देखणी म्हैस व देखणा रेडा स्पर्धा होणार आहेत. याचवेळी मालकाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत कमीतकमी वेळेत मालकाबरोबर गाडीमागून धावून येणाऱ्या म्हशीच्या व रेड्याच्या शर्यती होतील.या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन संयोजक संतोष शिंदे यांनी केले आहे.
या स्पर्धा जिल्हा म्हैसधारक व दुध व्यावसायिक असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धा होतील. म्हैस प्रकारात मुऱ्हा,पंढरपुरी,जाफराबादी असे तीन गट आहेत. सर्व जातींच्या रेड्यांसाठी एकच गट राहील.देखणी म्हैस व देखणा रेडा स्पर्धेतील पहिल्या ३ विजेत्यांना अनुक्रमे ५,३ व २ पिशवी अर्जुन सरकी पेंड व ढाल बक्षीस स्वरूपात देण्यात येईल. म्हैस पळवणे स्पर्धेतील विजेत्यांना १०,७,५ व ३ हजारांची तर रेडकू पालविण्याच्या(पूर्ण वाढ झालेले रेडकू) स्पर्धेतील विजेत्यांना ५,४,३ व २ हजार रुपये रोख बक्षीसे आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ७५१ रुपये असून स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक म्हशीसाठी एक पिशवी सरकी पेंड दिली जाणार आहे.
संकेशवर रोडवरील मार्केट यार्ड परिसरात दुपारी १२ वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here